पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदावर कार्यरत असणारे, नितीन केंजळे व राकेश विटकर यांना पोलीस अधिकाऱ्यांसारखी वर्दी व ओळखचिन्ह वापरण्याचा अधिकार आहे काय?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत ज्या खात्यातून पैसे मिळतील, त्या खात्यातील सेवकांच्या पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जात आहेत. ज्या खात्यातुन टेंडर सिस्टिम कार्यरत आहे, त्याच खात्यात केवळ जवळच्या सेवकांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या जात आहेत. पैसे देणाऱ्या सेवकांनाच अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभारावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. असा सर्व प्रकार आज पुणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटी सुरू असल्याची ओरड आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर उघडपणे किती पैसे घेतात याचे तक्रार अर्ज शासन दरबारी पाठविले आहेत. तसेच ज्या सेवकांना अतिरिक्त व प्रभारी पदभार दिला आहे, आज तेच सेवक कोणताही अधिकार नसतांना, तसेच भारतीय दंड विधान संहितेतील कलम 171 चा भंग करीत असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे त...