खडकी व विश्रांतवाडीतील अपराध्यांच्या गैरकृत्यांना वरीष्ठ पोलीसांची संमती… तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध धंदयावर रायटर,पंटर म्हणून काम करीत असल्यास त्याचे श्रेय नेमके कुणाला…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून दखलपात्र अपराधांच्या घटनेसंबंधीची किंवा असे अपराध करण्याच्या बेतासंबंधीची माहिती मिळवणे, ते वरिष्ठांकडे सादर करणे, अपराद्यांना न्यायालयासमोर आणण्यासाठी तसेच अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सर्वोत्तम अशा कायदा व वरिष्ठांचे आदेश यांच्याशी सुसंगत असलेल्या उपाययोजना करणे आणि गुन्ह्याचा प्रतिबंध व अन्वेषण करण्यासंबंधी मुंबई पोलीस अधिनियमात तरतुदी आहेत. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने पोलिसांना कायदेशीरपणे दिलेल्या प्रत्येक आदेशिकेचे तत्परतेने पालन करणे, त्याची बजावणी करणे आणि वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञा सर्व कायदेशीर मार्गाने अमंलात आणणे बाबत सक्त तरतुदी आहे.तथापी खडकी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अपराधाचा बेत आणि प्रत्यक्ष अपराध घडत असताना देखील, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कायद्याची व वरिष्ठांच्या आदेशांची अवज्ञा केली ...