Wednesday, January 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punepolicetransfers

पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सार्वत्रिक निवडणूका आणि ललित पाटील प्रकरणांतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात प्रथम मोठ्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सुमारे 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यानंतर काल मकरसंक्रातीचे दिवशी सोमवार दि.15 जानेवारी रोजी सुमारे 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजीच्या बदली आदेशात अंमली पदार्थ विरोधी पथक 1 व 2 मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अक्षरशः बोळवण करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही अधिकारी फिल्डवर फिट असतात तर काही अधिकारी हे दरबारी कामातच तरबेज असतात. पुण्यात ललित पाटील प्रकरण झाल्यानंतर विनायक गायकवाड यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता काही महिन्यानंतर पुन्हा त्यांची बदली दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक क्र. 1 येथे करण्यात आ...