Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: puneips

पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

सर्व साधारण
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/प्रतिनिधी/पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभाग, टॅक्स, अतिक्रमण, आकाश चिन्ह व परवाना विभाग याच्यासह एकूण 15 महसुली खात्यामध्ये नियुक्ती मिळावी तसेच नियुक्ती मिळाल्यानंतर, पदोन्नती मिळावी परंतु त्याच खात्यात परंतु नियुक्ती मिळाल्यानंतर, पुन्हा कधीच बदली होऊ नये याच्यासाठी पुणे महानगरपालिकेतील तांत्रिक व अतांत्रिक सेवकांची नेहमी धडपड सुरू असते. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या बाहेर अनेक संस्था, संघटना व राजकीय पक्षाने बदलीच्या घोडेबाजाराविरुद्ध तीव्र आंदोलने केली असल्याने पुणे महानगरपालिकेवे प्रशासक श्री. विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक बदल्यांचा धडाका सुरू केला. यामध्ये तांत्रिक व अतांत्रिक विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान सार्वत्रिक बदल्यांमध्ये नको असलेल्या खात्या...