पुणे पोलीसांवर हल्ला करण्याची सुपारी कुणी दिली ?
pune police attack
पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेळेस पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतही तीन/चार पोलीसांवर प्राणघातक हल्ला झाला. पाच सहा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीसांवर हल्ले झाले आहेत. या हल्यामागे नेमके कोण आहे.विमानतळ पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार श्री. सचिन जगदाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आहे. त्यात कारण तर काय, श्री. जगदाळे हे नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यामुळे चायनिज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. परंतु आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले वय- 24 रा. जिल्हा उस्मानाबाद याला जेवायला मिळाले नाही म्हणून त्याने पोलीसांवर चाकुने हल्ला केला अशी सर्वत्र बातमी प्रसारित झाली आहे. भले… भले… नागरीक आणि गुन्हेगारही पोलीसांपासून चार हात दूर राहतात. त्यात उस्मानाबाद म्हटल्यानंतर तर … पाहुणा ...