Wednesday, September 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Pune Municipality Establishment Department

पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

शासन यंत्रणा
जो जास्त भ्रष्टाचार करणार, त्यालाच मोठ्या पदावर पदस्थापना मिळणार,मेरिट/गुणवत्तेच्या निव्वळ बाताच मारणार, प्रत्यक्षात थैली किती वजनदार आहे, त्यावरच सर्व अवलंबुन असते. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महापालिकेत पैशांचा बाजार भरलाय… जो उठतो तो प्रभारी पदभार घेवून त्याच्या सध्याच्या पदापेक्षा मोठ्या पदांवर पदस्थापना घेतल्याचे दिसते. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात तर ज्या अभियंत्याला पहिल्या टप्प्यातील पदोन्नती देखील मिळाली नाही, त्याला थेटच प्रभारी उपअभियंता म्हणून पदस्थापना दिली, कालपर्यंत अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकाला थेटच प्रशासन अधिकारी या पदाचा अनुभव डिलिट मारून त्याला थेट सहायक आयुक्त पदावर बसविले. मागील आठवड्यात उपआयुक्त पदांचा तपशील जाहीर केला, त्यात संदीप कदम, सोमनाथ बनकर, चेतना केरूरे,आशा राऊत यांना थेट महत्वाच्या व मोठ्या पदांवर नियुक्ती दिल्या...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

सर्व साधारण
प्रशासकीय सेवेतील 15 महापालिका सहाय्यक आयुक्त पदांवर शासन किंवा तांत्रिक सेवकांची नियुक्ती,नियमांवर बोट ठेवून, प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना वॉर्ड ऑफिसर पदांपासून वंचित ठेवले नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुणे महापालिकेतील प्रशासकीय सेवांतर्गत सध्या खेकड्यांची स्पर्धा, घुबडांची स्पर्धा आणि कोंबड्यांच्या झुंजी असा खेळ सुरू आहे. त्यामुळे तुला ना… मला… घाल…कुत्र्याला अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेतील महापालिका सहायक आयुक्त पदांसाठी एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे एकुण 15 क्षेत्रिय कार्यालयातील बहुतांश वॉर्ड ऑफिसर पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रभारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुळात पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अतांत्रिक पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही अशी महत्वाची अट आहे. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात ...
पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

शासन यंत्रणा
*अ वर्ग पुणे महापालिकेतील प्रशासकीय कार्यालयाची अवस्था, मुंबईतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीसारखी…*एसटी आणि रिक्षात प्रवाशी कोंबुन भरावे तसे, प्रशासकीय सेवक व फाईलचे गठ्ठे ठेवले आहेत, पावसाळ्यात तर कागदांच्या कुबट वासाने थांबुही वाटत नाही… मग सेवक कसे काम करीत असतील… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात हडपसर ते स्वारगेट, कात्रज ते स्वारगेट, मार्केट ते मंडई, मंडई ते स्वारगेट या प्रवासा दरम्यान शेअर ऑटो रिक्षामध्ये जसे प्रवाशी कोंबुन भरले जातात किंवा पुणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना जसे रिक्षावाले काका कोंबुन-कोंबुन भरतात तशी अवस्था सध्या पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाली आहे. मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीमधील घरे जशी एकमेकांना चिकटून आहेत, आणि त्यातुन जसा कुबट वास दुरपर्यंत पसरलेला असतो तशी अवस्था सामान...