
PMC-सिंहगड वॉर्ड ऑफिस – कोट्यवधी रुपये खर्चाच्या झाडणकाम ठेकेदारांना मुदतवाढ देण्याच्या हालचाली…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे शहराची स्वच्छता आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या नावाखाली पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील सुमारे एक हजार 200 कोटी रुपयांचा चुराडा केला जात आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही संपूर्ण देशात पुणे महापालिकेचा 10 च्या आत क्रमांक येत नाही. सलग 10 वर्षात पुणे महापालिकेचा 1 ते 5 मध्ये क्रमांक आलेला नाही. तरी देखील कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तथाकथित 2100 ते 2500 मे. टन कचरा निर्माण होत असल्याचा पुणे महापालिकेतील दावा आहे. तरी देखील पुणे शहरात जागोजागा क्रॉनिक स्पॉट गच्च भरलेले असतात. रस्त्यांवर कचरा ओसंडून वाहत असतो. शेकडो संस्था काम करीत आहेत. तरी देखील कचरा हटत नसल्याचे पुणे शहरात चित्र दिसून येत आहे. एका उदाहरणादाखल मागील तीन महिन्यांपासून सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कित्येक क्रॉनिट स्पॉटवरून नॅशनल फोरम यांनी...