Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune Assembly Constituency

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आपण दलित आहोत की आदिवासी, ओबीसी आहोत की, भटके विमुक्त हे सर्व आरक्षणाच्या कक्षेत येतात. ज्या ज्या समाज घटकांनी, ज्या ज्या लहान मोठ्या पक्षांनी काँग्रेस किंवा भाजपाला आजपर्यंत समर्थन दिले ते सर्व पक्ष, संघटना नेस्तनाबुत झाले आहेत. नामशेष झाले आहेत. मुस्लिम समाजाने आजपर्यंत काँग्रेसला साथ दिली, आज त्याच मुसलमानांना काँग्रेसने 288 पैकी 3 जागा दिल्या आहेत, शिवसेना ठाकरे गटाने 288 पैकी एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 288 पैकी केवळ 2 ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिली आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या दोन ते अडीज कोटी आहे. एवढ्या मोठ्या समाजाला एकाही पक्षाने आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी उमेदवारी देत नाहीत. महाराष्ट्रातून मुस्लिम आणि ओबीसीचा एकही खासदार नसावा ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांची मते आम्हालाच...