ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदेशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक व...