पुणे महानगरपालिकेत टेंडरराज,
ठेकेदारांच्या सोईसाठी टेंडर मधील अटीं मध्ये बदल- राष्ट्रवादीचा आरोप
pmcpune
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महानगरपालिकेत रस्त्याच्या कामाच्या टेंडरमध्ये ठराविक ठेकेदराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करणयासाठी व त्यात दबाव आणून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनपेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे सुरू असलेले टेंडरराज राज्यात शिंदे फडणवीस सरकार अल्यानंतर पुन्हा सुरू झाले असून यात सर्वसामान्य पुणेकरांच्या कररूपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान पुणे महानगरपालिकेतील विधी विभाग, बांधकाम विभाग, कामगार कल्याण व सामान्य प्रशासन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संविधान परिषद...