Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Nationalist Congress Ajit Pawar Group

काँग्रेस,भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे या पक्षाकडून पुण्यातील वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेलला कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती, यांचे उमेदवारही कोट्याधीश-अब्जाधीश…

काँग्रेस,भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे या पक्षाकडून पुण्यातील वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेलला कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती, यांचे उमेदवारही कोट्याधीश-अब्जाधीश…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुण्यातील नामांकित असलेल्या सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना या बिग बजेट वृत्तपत्रांमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्यासह राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षांने कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती दिल्या असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. त्यात टिव्ही चॅनेलवर दर दोन पाच मिनटांनी ह्याच पक्षांच्या जाहीराती सुरू आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या राज्यातील सर्वच मोठ्या वृत्तपत्रांमध्ये व टिव्ही चॅनेलवर जाहीराती सुरू आहेत. त्यातच वृत्तपत्रांच्या ऑनलाईन न्युजवर देखील याच राजकीय पक्षांच्या जाहीराती सुरू आहेत. बहुतांश यु-ट्युब वरील एंटरटेन्मेंट व बातम्यां मध्ये ह्यांच्या जाहीरातील सुरू आहेत. ह्या जाहीराती फुकट दिल्या जात नाहीत. जाहीर...
बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

सर्व साधारण
महाराष्ट्रातील 800 पैकी 799 जातींना डोक्यावर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ह्यांना जाती- जाती आणि धर्मा धर्मात… हिंदू - मुस्लिम खेळात गुंतवून ठेवून 70 वर्ष सत्ता राखली व आताही पुढील 70 वर्ष आमचेच असतील. विषय प्रवेश -बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे याचा खालील प्रमाणे उहापोह केला आहे. देशात एकुण 6 हजार जाती आहेत. तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या आसपास असून राज्यात 800 पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक राहतात. दरम्यान मागील महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत 800 जातीपैंकी केवळ एकाच जातीचे 31 खासदार निवडणूक आणण्यात आपल्यास यश आले आहे. आता विधानसभेच्या निवडणूका देखील तोंडावर आहेत. त्यातच सध्याच्या विधानसभेत एकाट्या मराठा समाजाचे 190 आमदार आहेत. तर ओबीसींचे 11 आमदार आहेत. एससी/एसटीच्या आरक्षणाच्या 58 आमदार आहेत. दरम्यान बाळासाहेब आंबेडक...