एका दिवसात 2500 अनाधिकृत फ्लेक्स बॅनरवर कारवाई करणारे माधव जगताप, बिबवेवाडीतील थकित 2 कोटी रुपये वसूल करणार की त्यावर पाणी सोडणार…?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे उपआयुक्त श्री. माधव जगताप यांनी अतिक्रमण व टॅक्स विभागात केलेल्या गलथान कारभारामुळे पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊन जनमानसात पुणे महापालिकेची प्रतिमा मलिन केली म्हणून तत्कालिन आयुक्तांनी माधव जगताप यांची बदली करून दोन इन्क्रीमेंट स्टॉप करण्याची शिक्षा देण्यात आली होती. आता पुन्हा सहा महिन्यानंतर श्री. माधव जगताप यांच्याकडे आकाशचिन्ह विभागाचा पदभार देण्यात आलेला आहे. त्यांनी आकाशचिन्ह विभागात पाय ठेवता क्षणीच पहिल्याच महिन्यात व एकाच दिवसात, पुणे शहरातील सुमारे 2500 फ्लेक्स बॅनर्स, होर्डींग काढून टाकल्याच्या व जे अनाधिकृत बोर्ड बॅनर्स लावतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व दंडात्मक कारवाई करणर असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. त्यानुसार काही वृत्तपत्रांसह काही न्यूज पोर्टलवर त्यांच्या ह्या बातम्या फोटोसहित प्रसारित करण्यात आल...









