चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील खराडी चौकातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्ठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
धडक कारवाई -अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते आणि संदेश काकडे हे चंदनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते.यावेळी पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके आणि मारूती पारधी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काहीजण हे खराडी चौकातुन रक्षक नगरकडे जाणाऱ्या सार...