Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Maratha vs OBC conflict in NCP

राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी, स्वतःला विरोधी पक्ष पदावर जबाबदारी काढुन घेवून ती जबाबदारी इतरांवर देण्याबाबत माध्यमांमध्ये भाष्य केले आहे. खरं तर विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याबाबत त्यांनी हे विधान नेमकं का केलं याबाबत तर्क वितर्क होत असतांनाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वतःकडे ठेवण्यासाठीच अजितदादांनी हे विधान केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील बहुतांश मुख्य पदांवर श्रीमंत मराठा समाजाला स्थान देण्यात आले आहे. आता देखील प्रदेश अध्यक्ष पदावर अजितदादांनी हक्क सांगायला सुरूवात केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस मधील ओबीसी नेते देखील सतर्क झाले आहेत. ओबीसी नेत्यांनी देखील प्रदेशअध्यक्ष पदावर हक्क सांगत आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक...