सामाजिक सुरक्षा विभागाची विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अर्धवट कारवाई? खडकी अणि विमानतळ यांना सवलतीच्या दरात जुगार अड्डयांना परवानगी?
पुणे/दि/ नॅशनल फोरम/विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सध्या मटका, जुगार अड्डे, सोरट, पणती पाकोळी सारखे धंदे सुरू असून, त्याच बरोबरीने हातभट्टी, देशी विदेशी दारूची भर रस्त्यावर खुलेआम विक्री केली जात असल्याची बातमी नॅशनल फोरम मध्ये प्रकाशित केली होती. तसेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीक अतिशय गरीब व मध्यमवर्गीय समाजघटकातील आहेत. विशेषतः बौद्ध व वडार समाज संख्येने जास्त असून इतर समाज त्यांच्या खोलोखाल आहे. शांतीनगर, राजीव गांधी नगर, एकता नगर, भिमनगर, वडारवाडी, फुले नगर, पंचशिल नगर या मोठ्या घनतेच्या लोकसंख्या असलेल्या स्लम विभागात अवैध धंदे सुरू असतांना, सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने 17 फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडार वस्ती येथील जुगार अड्डयावर कारवाई करून सुमारे 16 इसमांना...