पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा दर 30 लाख रुपये, पुणे महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला…
pmcpune
बदली घोटाळा रोखण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्षांचे नगरविकास मंत्र्यांकडे निवेदन
नॅशनल फोरम /पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेत वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 20 लाख रुपये, वर्ग 2 व 3 साठी 10 लाख रुपये तर अपेक्षित विभागात बदली करून घ्यायची असेल तर 10 लाख रुपये असा बाजार पुणे महापालिकेत भरला असून, पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून महापालिकेचा कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायती पेक्षा खाली घसरलेला असल्याचे निवेदन काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नगरविकासमंत्र्याकडे पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान आधी काम केलेल्या मलईदार विभागात काम करायची तीव्र इच्छा असल्यास वर्ग कोणताही असला तरी बदलाचा भाव 30 लाख रुपये असल्याची चर्चा पुणे पुणे महापालिकेत आहे. भावाबद्दल कोणतीही घासाघिस करू नये. आम्हाला उत्पन्नाचा काही भाग वरिष्ठांना दयावा लागतो असे अधिकार...