Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: guardian minister Chandrakant Patil

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट<br>अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट
अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील वर्ग 3 मधील वरिष्ठ लिपिक टंकलेखक ते उपअधीक्षक, उपअधीक्षक पदावरून अधीक्षक व अधीक्षक पदावरून प्रशासन अधिकारी पदाचा तिढा वाढला असून, कर्मचाऱ्यांमध्ये कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय अशी आज पुणे महापालिकेतील निर्णय घेण्याची पद्धत रूढ झाली असल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मानिव दिनांक देऊन देखील जाणिपूर्वक खोडसाळपणे पदोन्नती देण्यात वेळकाढुपणा केला जात असल्याचा आरोप करून ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला देखील कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुणे महापालिकेतील वरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांना उपअधीक्षक या पदावर व उपअध...