
गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन
इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजीचा भंग करून तथाकथित सरकारमान्य लॉटऱ्यांचा धुमाकूळ
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलंबविले असतांना, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका सराईत गुन्हेगाराचे आर्थिक पुर्नवसन केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आय...