Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Criminal gangs in Pune

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद<br>पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

नवीन तयार होणाऱ्या टपरीछाप भाईंना, नियमित मिळणार पोलीसांचा तिर्थप्रसाद
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्यासाठी आता, पुणे पोलीसांचे दररोज पेट्रोलिंग व चेकींग,

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/साऊथचे टपोरी चित्रपट, त्यातील जब्बर फायटींग, सोशल मिडीयावरील भाईंच्या वाढदिवसाचे पोस्टर, भाईंना घाबरून जाणारे दुकानदार, बिल्डर यामुळे आता, आपण भाई झालंच पाहिजे असे हल्लीच्या युवकामध्ये नवीन फॅशन तयार झाली असल्यासारखे वातावरण सध्या पुणे शहरात दिसून येत आहे. त्यातच खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्याच्या वसुलीसाठी त्यात अशा नवीन तयार होणाऱ्या भाईंना मोठी डिमांड वाढली असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे मोठ्ठा भाई बनण्यासाठी पुणे शहरातील काही पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन भाईंनी तर कायदा आणि पोलीसांचा धाक मुळा मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे वर्तन ठेवले होते. त्यातच हिंदी चित्रपटातील व्हिलन सारखे ड्रग्ज घेतल्यानंतर पॉवर येते की काय असे मनांशी बाळगुन आता शहरात ड्रग्जचेही फॅड अधिक वाढले आहे. परंतु आता नवीन भाईंनो, रस्त्यावर येवून राडा कराल तर पुणे शहर पोलीस नियमितपणे रस्...