Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: crime unit police

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मटका जुगार अड्डयावर पोलीसांनी कारवाई केली, म्हणून पोलीसांवर हात उगारणाऱ्या मटका अड्डयाच्या मालकाला पोलीसांनी तडीपारीची का करू नये अशी नोटीस काढली… मग काय… त्याने सहायक पोलीस आयुक्त फरासखान्याला दरदिवशी 10 प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम सुरू केला. पुढे एमपीडीएची तरतुद ठेवण्यात आली. तेंव्हा तर देवाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या नसतील तेवढ्या प्रदक्षिणा फरासखाना इमारतीला घातल्या. पुढे कारवाई नाममात्र करून, मोठी कारवाई संस्थगित ठेवण्यात आली आणि आता पुनः समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत नव्याने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. भिमनगराकडे जाणाऱ्या ऑईलच्या दुकानापासून ते पॉवर हाऊसपर्यंत त्याने रान पेटवुन ठेवले आहे. सगळीकडे गप्पाही गप्पामय वातावरण निर्माण झाले आहे. जागोजाग रायटर आणि पंटरचा धुमाकुळ सुरू आहे. एवढी मेहेरबानी समर्थ पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलीसांनी का केली असावी...