विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत वेश्याव्यवसायाचा कहर झाला, सामाजिक सुरक्षा विभागाकडून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा
निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांची छापेमारी
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर व गैरकायदयाच्या राज्याचे थैमान घातले आहे. कॉलसेंटर, मॉल्सच्या बाजारपेठांमुळे उच्चभ्रु व गर्भश्रीमंतांचा येथे राबता वाढत आहे. त्यामुळे या भागात एैशोआराम आणि चैनीच्या सुविधांचा सुकाळ झाला आहे. बेकायदेशिर व गैरकायदयाचे असले तरीही त्यांचा विकास व विस्तार वाढत चालला आहे. अनेक स्थानिक सामाजिक व राजकीय संघटनांनी विमानतळ पोलीस स्टेशनला बँकॉक व दुबई अशी नावे दिली आहेत. याच देशात सर्वाधिक एैयाशी असल्याने त्याचे नाव विमानतळ पोलीस स्टेशनला दिले आहे. तसेच अनेक निवेदने देवून अशा प्रकारचे अवैध व बेकायदेशिर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन स्वतःहून कारवाई करीत नसल्याचे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. दरम...