Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Corruption in the post of security officer

पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

सर्व साधारण
नितीन केंजळे व राकेश विटकर यांच्या खाबुगिरीला कुठेतरी लगाम घालण्याची 10 हजार कंत्राटी कामगारांची मागणीनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचा आकृतीबंध हा भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना निमंत्रण देणारा आहे. सेवा प्रवेश नियमावलीमध्ये अनुभव, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्तींमध्ये कमालीचा भेदभाव करण्यात आला आहे. पदोन्नतीमध्ये देखील नियमबाह्य तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात जो पैसे घेवून येईल त्याला पदभार देण्यासाठीच ह्या तरतुदी केल्या आहेत. केवळ शासन आणि मंजुर आकृतीबंधावर खापर फोडण्यापेक्षा त्यातील त्रुटी काढुन आकृतीबंध परिपूर्ण करणे आवश्यक ठरत आहे. तथापी जाणिवपूर्वक त्यात त्रुटी ठेवून, चुकीच्या आकृतीबंधाची गैरमार्गाने अंमलबजावणी सुरू आहे. सुरक्षा अधिकारी हे पद देखील भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले आहे. यापर्वी देखील आम्ही कामगार विभाग, विधी विभागातील आकृतीबंधातील तरतुदींमध्ये कशी विसंगत...