प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना छुप्या मार्गाने पदोन्नत करण्याच्या हालचाली, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न…
25 लाखात उपकामगार अधिकारी पदाचा सौदाकोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आंदोलनकर्त्यांचे आरोपनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा नियम 2014 नुसार पुणे महापालिकेत अंशकालिक, कंत्राटी, रोजंदारी, मानसेवा किंवा प्रभारी व अतिरिक्त पदभार- पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना केलेल्या कामांचा अनुभव पुणे महापालिकेतील नोकरी किंवा पदोन्नती देतांना करू नये तसेच तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांना अतांत्रिक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे शासनाने मंजुर केलेल्या सेवा प्रवेश नियम अर्थात आकृतीबंधामध्ये नमूद आहे. तथापी प्रभारी उपकामगार अधिकारी या अतांत्रिक पदावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोणतीही सेवाज्येष्ठता न पाहता, प्रभारी उपकामगार अधिकारी पदावर एकुण 8 कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच या प्रभारी उपकामगार अधिकारी यांनी केलेल्या कामाचा पदोन्नतीसाठी अनुभव म्हणून वापर करण्यात आला आ...