पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अभियंते पदोन्नतीपासून वंचित
पुणे महापालिका किती वर्ष मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा छळ करणार…सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला तरी 20 वर्ष पदोन्नती नाही…
विभागीय आयुक्त कार्यालयाकडील मागासवर्गीय कक्षाच्या पत्राला केराची टोपली…
पुणे/दि/ नॅशनल फोरम/राज्यात मागील 40/50 वर्ष सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी भारतीय संविधानातील आरक्षण व पदोन्नतीचे आरक्षणाची किंवा कालबद्ध पदोन्नतीची प्रभावी अंमलबजावणी केली असती तर आज शासकीय कार्यालयातील नोकरीतील पदाचे आरक्षण व पदोन्नतीच्या आरक्षणाचा विचका झाला नसता. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा-सेना या पक्षांनी केवळ मागासवर्गीय बहुजन समाजाबद्दल कायम दुजाभाव ठेवुन घटनात्मक आरक्षणाची पायमल्ली केली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अक्षरशः संगनमताने मागासवर्गीय जनतेवर सुड उगविला असल्याचे आज पुन्हा दिसून आले आहे. पुणे महापालिकेतील नोकर भरतीमधील गैरकारभार बाहेर आला असून, याबा...