खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,
चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँग आणि अल्पवयीन मुलांकडून शहरात जबरी गुन्हे घडविले जात असल्याचे पुणे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच पोलीस स्टेशन स्तरावरून फरार आरोपींचा शोध लागत नसल्याची सततची ओरड वरीष्ठांकडून होत होती. पोलीस स्टेशन स्तरावरून गुन्ह्यांचे अन्वेषण होऊन फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत अधिकचे पाऊल उचलले गेल्यामुळे आज पुणे शहरातील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपी मिळून आले आहेत. पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्याकडून प्रत्येक एक फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चंदननगर पोलीस स्टेशन कडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या -चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माह...