खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..
khadak police pune
खडक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपातच असतात हे खरे आहे काय…
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुले हातात कोयता, हॉकीस्टीक सारखी हत्यारे घेवून दहशत माजवित सुटले आहेत. चिल्लर पार्टी सारखी वानर सेना संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आग लावत सुटली आहेत. सगळीकडे दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुख्यात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. असे असतांना खडक पोलीस स्टेशन मधील डीओंची दादागिरी समोर आली असुन अनेक पोलीस कर्मचारी त्रस्त झाले असल्याची माहिती नॅशनल फोरमला मिळाली आहे. त्यामुळे त्या दादागिरी करणाऱ्या डीओंवर सहायक पोलीस आयुक्त किंवा उपआयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नॅशनल फोरम प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 य...