महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व विघातक कायदयानुसार पुण्यातील गुन्हेगारांविरूद्ध धडक कारवाई, पर्वती पोलीस स्टेशन 70 तर… खडकी पोलीस स्टेशनमध्ये 71 वी कारवाई…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 नुसार पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत या कायदयाखाली सुमारे 71 जणांविरूद्ध कठोर कारवाई करून त्यांना राज्यातील विविध कारागृहात डांबण्यात आले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास बाधा येईल अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन करणाऱ्यांविरूद्ध या कायदयानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. पर्वती पोलीस स्टेशन व खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराविरूद्ध चालु सप्ताहात कारवाई करून त्यांना वेगवेगळ्या कारागृहत बंदिस्त करण्यात आले आहे.
पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 70 वी एमपीडीए कारवाई -पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार नामे यश उर्फ मनोज दिनेश मेरवाडे, वय-22 वर्ष. रा.स.नं. 130. दांडेकर पुल मारणे गिरणी समोर सिंहगड रोड, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, तलवार, ल...