Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: A criminal who escaped from Osmanabad

उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करून पुण्यात पळुन आलेल्या गुन्हेगाराला पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी जेरबंद केले आहे. शिराढोन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302, 364, 324, 323, 504, 506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने उस्मानाबद येथे गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्निक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 05 श्री. विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आ...