Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: हुक्का पार्लर आणि वेश्याव्यसाय

पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लर, गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?

पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लर, गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?

पोलीस क्राइम
क्राईम युनिट मधील बदली नंतर, पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपुष्टात येते काय….नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गांजा आणि अंमली पदार्थांच्या धुराचे लोट उठत आहेत. स्थानिक नागरीकांनी शेकडोंनी तक्रारी केल्या तरी मसाज पार्लरच्या माध्यमातून सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद केला जात नाहीये. त्यातच मटका अड्डे, ऑनलाईन लॉटरी जुगारासह हातभट्टी व देशी विदेशी दारूने संपूर्ण भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला विळखा घातला आहे. असे असतांना देखील सध्या कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांना नियंत्रण आणता आलेले नाही. त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी स्थानिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी त्यांची भेट घेवून हद्दीतील अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय व हातभट्टीवर दारूवर कठोर कारवाईची मागणी केली होती. परंतु आजही त्यावर कारवाई होत नसल्याने अनेका...