शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे शहरातील संपूर्ण पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र कोंम्बिग ऑपरेशन सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजुला पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल हे स्वतः रस्त्यावर उतरून, वाहन परवाने तपासणे, दुचाकी वाहनावरील ट्रीपल सिट असणाऱ्यांवर स्वतः कारवाई करीत आहेत, तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील स्लम एरियात जाऊन तेथील मुले व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून व्यसनमुक्ती सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लहान मुलांचा गुन्हेगार कसे वापर करीत आहेत, मुले व्यसन कशी करीत आहेत याबाबत पालकांनी कसे जागृत असले पहिजे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मात्र भलताच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे पोलीस भागीदारीतील मटका...