Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: शिवसेना (उबाठा)

दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस हटावची चळवळ सुरू झाली. इंदिरा हटाव मोहिम सुरू झाली. पुढे कालांतराने आता भाजपाने देखील काँग्रेसचाच भांडवलदार धार्जिणा कार्यक्रम पुढे रेटल्याने, देशात मोदी हटाव, भाजपा हटाव म्हणून विरोधी पक्ष एक होत आहेत. कुणाला तरी विरोध म्हणून किंवा सत्तेसाठी विरोधी पक्ष एकवटत असला तरी यातून जनतेचे कोणतेही हीत होत नाही. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमावर आधारित सर्व राजकीय पक्षांनी एक होवून देशातील निवडणूकांना सामोरे जावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागील दोन ते अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व जिल्ह्यात 8 ते 10 लाखांच्या सभा पार पडत आहेत. दरम्यान वंचित व शिवसेना उबाठ...