शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा… वंचित बहुजन आघाडीची राज्यात ताकद किती?
vanchit-shevsena
लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र आलो आहोत- ठाकरे
संयुक्त पत्रकार परिषदेत बाळासाहेब काय म्हणाले…
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन ज्ञ आम्ही एकत्र का आलो?
राजगृह- दादर- मुंबई/आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वंचित व शिवेसना युतीची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड आहे. त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्रात नविन युतीची चर्चा असणार आहे. आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली. त्यामुळे आता शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गटासोबत आंबेडकरांनी युती केल्या...