Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: शरद पवार

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर, मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर, मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट

राजकीय
धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून ते लवकरच शिंदेना रामराम ठोकुन राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे समजते. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून माहिती समोर येत आहे. कोण आहेत हे सचिन जोरे -ॲड.सचिन जोरे हे माजी न्यायाधीश असून, एमपीएसी मध्ये राज्यात प्रथम आले आहेत. टॉपर असलेले श्री. जोरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीकडून इंदापुर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सत्ताधारी भाजपा व काँग्रेसच्या उमेदवाराच्या तोडीची मते...
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा… वंचित बहुजन आघाडीची राज्यात ताकद किती?

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा… वंचित बहुजन आघाडीची राज्यात ताकद किती?

सर्व साधारण
vanchit-shevsena लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र आलो आहोत- ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत बाळासाहेब काय म्हणाले… वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन ज्ञ आम्ही एकत्र का आलो? राजगृह- दादर- मुंबई/आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वंचित व शिवेसना युतीची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड आहे. त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्रात नविन युतीची चर्चा असणार आहे. आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली. त्यामुळे आता शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गटासोबत आंबेडकरांनी युती केल्या...