बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप-आरएसएसने आपल्या निवडणूक फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे.
माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली होती की, “जर पक्षांनी देशापेक्षा महत्वाचा पंथ ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल.” माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. “देशा पेक्षा जास्त पंथा ला महत्वाचं मानणाऱ्या ” भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्री माई, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी पत्रावर सही केली....