वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील मुंबई बेंगलोर महामार्गावर गेले अनेक दिवस नागरिकांना पथारी व्यावसायिकांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु संबंधित व्यवसाय धारक हे खाजगी जागेत असल्याचे भासऊन अनधिकृतरित्या महामार्गावर व्यवसाय करीत असल्याचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या धडक कारवाईत साधारण 06 बिगर टप हातगाडी, 1 लोखंडी काउंटर, 14 मोठे टायर, 2 टेंथ, 1 वजन काटा, 6 कॅरेट फळ पथारी, 1 गॉगल स्टॅन्ड, 25 टेडी, 20 चादरी, 5 गाद्या व 40 रजया जप्त करण्यात आल्या व 5 कच्चे शेड पाडून टाकण्यात आले.
सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात विरोध केला, परंतु विरोधाला न जुमानता ही करावाई चालू ठेवली. वा...