लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/भाजप प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे. महाविकास आघाडीतही तणाव आहे. मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला असल्याची बातमी लोकमतच्या पहिल्या पानावर यदु जोशी यांच्या नावाने बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये तणाव आहे, खटके उडत आहेत. तसेच भाजप प्रणित महायुतीमध्ये देखील तणाव असल्याचे नमूद केलं आहे. दरम्यान या दोन प्रस्थापितांच्या महायुती व महाआघाडीच्या सत्तास्पर्धेच्या वादात बदनामी मात्र वंचित बहुजन आघाडीची केली जात आहे.
काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रथम काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या बैठका म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही असं खोचक विधान काँग...