प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. देशात 10 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढण्यापेक्षा, हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी विरूद्ध गरळ ओकत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. त्यांची देशात व राज्यात कुठेही सत्ता नव्हती, तरी देखील वंचित बहुजन आघाडीविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चार पक्ष का तुटून पडले आहेत याचा विचार होणे गरजेचे ठरत आहेत. महायुती व महाविकास आघाडीने राज्यात एकाही मुस्लिम समाजातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. आंबेडकरी समुहातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. भटके, विमुक्त, आलुतेदार- बलुतेदारांना उमेदवारी दिली नाही. या समाजाने केवळ महायुती व महाविकास आघाडीला मतदान करायचे, परंतु सत्तेत वाटा मागायचा नाही असेच धोरण आजपर्यंत ठ...