पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार आरोपी गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून एमपीडीए व मकोका अन्वये कारवाया केल्या जात आहेत. तथापि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी गुन्हेगारांचा पुणे शहरात मुक्तपणे संचार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी केलेल्या कारवाईवरून दिसून आलेले आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ने केला पर्दाफाश-भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा व मध्यरात्री लुटालुटीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच प्रकरण 28 एप्रिल 2023 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडले होते. 28 एप्रिल 2023 रोजी डीपी कलेक्शन समोर चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर फिर्यादी त्यांची चार चाकी वाहन पार्क करून लघुशंका करण्यासाठी थांबले असता,...