पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा
pmcpune
महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दया, खुला व मागासांचा बॅकलॉग तत्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणीं
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेत सर्व खाते व पदांच्या बदली, पदोन्नती ,पदस्थापनेत लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असून, पुणे महापालिकेतील सेवकांना सेवाज्येष्ठता,गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तातडीने सर्व पदांसाठी सर्व सेवकांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच महापालिकेतील पदोन्नतीसाठी पात्र सेवकांना कायम कामगारांच्या सर्व पदांसाठी पदोन्नतीने 75 टक्के आरक्षण देऊन, सर्व पदांसाठी अनुभवाची अट किमान 3 वर्ष ठेवण्याच्या मागणीसाठी 1.पुणे महापालिका कामगार युनियन, 2.पीएमसी एम्प्लाईज युनियन, 3.पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना (क्रास्ट्राईब संलग्न) 4. पुणे महापालिका काम...