Sunday, January 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार

पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार करून मनमानी बदल, पुणे महापालिकेतील आरआरचा घोटाळा, हर्षद मेहता व तेलगी घोटाळ्यापेक्षा कमी नाही

पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार करून मनमानी बदल, पुणे महापालिकेतील आरआरचा घोटाळा, हर्षद मेहता व तेलगी घोटाळ्यापेक्षा कमी नाही

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहाराव यांच्या 1991-92 या आर्थिक वर्षात सुधारणांना सुरूवात झाली होती. गॅट व डंकेल करारावर स्वाक्षऱ्या करून संपूर्ण जगाला भारताचे दरवाजे खुले करण्यात आले. याच 1980-90 काळात हर्षद मेहताने सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केला, जो आजच्या काळात 50 हजार कोटी पेक्षा अधिक आहे. तर अब्दुल करीम तेलगी याने देखील 1992 मध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा केला, जो 2003 मध्ये उघड झाला. त्याने 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, आजच्या काळात त्याचे 150 हजार कोटी रुपये मूल्य होते. अशाच प्रकारचा महाघोटाळा पुणे महापालिकेत झाला आहे. 2014 मध्ये पुणे महापालिकेचा आकृतीबंध अर्थात सेवा प्रवेश नियम शासनाकडून मंजुर करून घेण्यात आला. सेवकांच्या भर्ती, पदोन्नतीमध्ये मनमानी अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. आता 9 वर्षानंतर पुन्हा त्यात बदल करून पुन्हा मनमानीपणे ब...