उद्या मतमोजणी, कलम 144 लागु, वाहतुकीत देखील बदल
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी उदया गुरूवार दि. 2 मार्च रोजी होत आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 144 प्रमाणे आदेश लागु केले आहेत. तसेच वाहतुक विभागाने देखील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी ही साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावुन, कोरेगाव पार्क, पुणे येथे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकाची गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तसेच वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालण्यासाठी वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
कलम 144 लागु - कसबा विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे होणार असल्याने मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे प शांततेत पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्य...