Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: बहुजन कार्यकर्त्यांवर असलेल्या राजकीय गुन्ह्यांचा प्रश्न

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पर्यायी राजकारण देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला आता नवा चेहरा मिळणार आहे. परदेशात शिक्षण घेऊन परत आलेल्या सुजात आंबेडकर यांनी पुन्हा सक्रीय होत बहुजन कार्यकर्त्यांवर असलेल्या राजकीय गुन्ह्यांचा प्रश्न हातात घेऊन सर्वपक्षीय युवकांना साद घातली आहे. सुजात आंबेडकर यांनी ‘सतरंजी उचल्या' अशी भूमिका असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांवर असलेल्या केसेस चा मुद्दा हातात घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. राजकीय आंदोलनं असोत, सण असोत किंवा रस्स्त्यावरचा संघर्ष, सामान्य कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असतात. नवरात्र मंडळ, गणपती मंडळ, दहीहंडी मंडळ असो नाही तर मोर्चे आंदोलनं, गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये बहुजन युवक, युवतींचा भरणा जास्त असतो. राजकीय पक्ष ही अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. कोर्टकचेऱ्या आणि पोलिस स्टे...