पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे.
उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल...