कर्मचार्यांचा संप माध्यमांनी जास्त कव्हर का केला नाही, माध्यमांची नेमकी काय भूमिका आहे. जवळपास सर्वच माध्यमे गोदी मिडिया आहेत, ही माध्यमं जनसामान्यांचे प्रश्न का कव्हर करत नाहीत. एस टी कर्मचारी जीवाच्या आकांताने लढतोय, मग माध्यमांना त्यासाठी जागा का द्यावीशी वाटत नाहीय. माध्यमांचं नेमकं काय चुकतंय. आर्यन खान साठी दहा बारा टीम लावणारी माध्यमे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी का पडतायत?
जीवावर उदार होऊन एसटी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. नक्कीच माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक पार पडली. राज्य शासनाने यापूर्वीही महामंडळाचे शासकीय विलीनीकरण शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे.
कार्यकर्ते एसटी कर्मचार्यांच्या इतर मागण्या मान्य करून हा संपवु शकतो का? प्रसार माध्यमांचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष का? प्रसारमाध्यमं जनतेच्या प्रश्नावर यापूर्वी अशीच वागली आहेत का?