पुणे/दि/ प्रतिनिधी/
वाढते पुणे शहर, वाढते नागरीकरण, त्यातच कॉल सेंटर, मॉल संस्कृती, देशी विदेशी पर्यटक आणि विद्यार्थ्यांचा पुण्याकडे असलेला ओढा पाहता, इथल्या व्यापारी आणि भांडवलदारी वृत्तीने चंगळवृत्ती जोपासण्याचे तंत्र विकसित केले आहे. नशेखोरी आणि देहव्यापर अर्थात याला चमडा बाजार असेही म्हटले जाते, तो देहव्यापार सुरू केला आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचे सुत्र बदलले असले तरी कारवाई सातत्याने सुरू ठेवली आहे हे विशेष आहे. मध्यवर्ती पुणे शहरासह पुण्याच्या उपनगरावर कुणाचेच लक्ष जात नाही. त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाने मध्यवर्ती शहरासह उपनगरावर लक्ष केंद्रीत करून तेथे सुरू असलेले अवैध धंदे मोडीत काढले जात आहेत. पुण्याचे मोठे उपनगर असलेल्या बाणेर येथे सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज पार्लर सेंटरवर कारवाई करून चार मुलींची सुटका केली आहे. दरम्यान चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत आजपर्यंत सामाजिक सुरक्षा विभागाने चालु वर्षात अनेकवेळा कारवाई करून देखील वेगवेगळे अवैध धंदे बंद होत नाहीत हे विशेष म्हणावे लागेल.
त्याची हकीकत अशी की, दि.7 डिसेंबर रोजी स्पंदन स्पा, बालेवाडी रोड, बाणेर, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आले. बाणेर येथील या स्पा सेंटरवर तत्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण 04 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
तसेच स्पा मालका विरूध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे 370,34 सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3.4.5 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी स्पा मालक व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.