Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

चतुःश्रृंगीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षेचा छापा

कुप्रसिध्द गुन्हेगार झुलकर खान व प्रमोद भेंडे याच्या जुगार अड्ड्यावरून
. 5.26 लाखांच्या मुद्देमालासह, 17 आरोपींविरुद्ध कारवाई.
कारवाईत चारचाकी, दुचाकी, मोबाईल सह टेबल, खुर्च्या, सोफे जप्त


पुणे/दि/ प्रतिनिधी/
सामाजिक सुरक्षा विभागास अवैध जुगाराच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, चतुःृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, दर्शन रीव्हर साईड हॉटेल, सांगवी स्पायसर रोड, औंध, या हॉटेलमध्ये व हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेत बाईकवर सुरू असलेल्या पैशावर मटका, सोरट, पंकी पाकोळी, वगैरे जुगार गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष या ठिकाणी रात्रौ सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून, सोरट, पंकी पाकोळी, मटका जुगार, वगैरे प्रकारचे जुगार खेळणारे तसेच अवैध रीत्या विदेशी मद्याचा साठा व विक्री करणारे आरोपी मिळून आलेने, 4 जुगार खेळवणारे, 4 जुगार खेळणारे व पाहीजे आरोपी 9 (त्यात जुगारासह अवैध विदेशी दारूचा साठा व विक्री करणारे) असे एकुण 17 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 व 12 (अ) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी अटक/कारवाई केलेल्याआरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

अ) मटका व अन्य जुगार घेणारे/रायटर्स/मॅनेजरची नांवे.

दर्शन रीव्हर साईड हॉटेलमध्ये बसून जुगार खेळणारे आरोपी.

1) विजयसिंग दलपतसिंग चौहान, वय-30 वर्ष, धंदा – जुगार खेळवणारा, रा. सर्वे नंबर 10, संत ज्ञानेश्वर नगर, वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव, पुणे-33.

2) सुरज प्रितीश साळुंखे, वय 33 वर्षे, धंदा जुगार खेळवणारा, रा.ठी. भैरवनगर, सर्वे नंबर 51, घर नंबर 46/ बी, धानोरी, पुणे.

दर्शन रीव्हर साईड हॉटेलबाहेर मोकळ्या जागेत पार्किंग मध्ये गाड्यांवर जुगार खेळवणारे आरोपी.

3) संकेत नंदू कदम, वय 23 वर्षे, धंदा जुगार खेळवणारा, रा.ठी. पाण्याची टाकी, विठ्ठल मंदिरा मागे, बालेवाडी पुणे.

4) फारुख सैफ खान, वय 23 वर्षे, धंदा – जुगार खेळवणारा, रा.ठी. रेल्वे क्रॉसिंग जवळ, बोपोडी, पुणे -12.

5) ईश्वर बाबुराव दामोदर, वय 32 वर्षे, धंदा – जुगार खेळवणारा, रा.ठी. पिंपळे गुरव, जगताप पेट्रोल पंपाजवळ, भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव, पुणे.

ब) पैशावर मटका, लॉटरी, सोरट, पंती पाकोळी जुगार खेळणारे खेळी आरोपी

6) लादे नागेश त्र्यंबक, वय 28 वर्षे, धंदा नोकरी, रा.ठी. लक्ष्मी हाइट्स, देशमुख वाडी, शिवणे वारजे पुणे. मुळगाव -तपसे चिंचोली, तालुका औसा, जिल्हा लातूर.

7) सचिन सुभाष सीताफळे, वय 30 वर्षे, धंदा नोकरी, रा.ठी. विष्णुराज बिल्डिंग, रूम नंबर 30, ज्योतिबा नगर, काळेवाडी पुणे – 17.

8) मुगलअप्पा बसप्पा कानकुर्ती, वय 35 वर्षे, धंदा नोकरी, रा. ठी. 199, अरुण निवास, रामनगर रहाटणी गाव, तालुका हवेली, पुणे.

क) घटना स्थळावरुन पळून गेलेले जुगार अड्डा मालक, विदेशी दारूचा साठा व विक्री करणारे मालक, मॅनेजर व इतर पाहिजे आरोपींची नांवे

9) मोहम्मद झुलकार मजहर खान, धंदा जुगार अड्डा मालक व हॉटेल चालक, रा.ठी. सायली पार्क, जगताप डेरी रोड, पिंपळे सौदागर, औध कॅम्प, पुणे – 411027.

10) प्रमोद रमेश धेंडे, वय सुमारे 40 वर्षे, धंदा जुगार अड्डा मॅनेजर व हॉटेल चालक, रा.ठी. यशदा स्वेयर जवळ, सर्व्हे क्र. 142/1/2, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे – 411027.

11) नवल नहाडे, धंदा – जुगार मॅनेजर व हॉटेल चालक, वय अंदाजे 35 वर्षे, रा.ठी. पिंपळे सौदागर, पुणे.

12) चंद्रकांत कबीर जाधव, वय अंदाजे 35 वर्षे, धंदा जुगार अड्डा मॅनेजर व हॉटेल चालक, रा.ठी. बौद्ध नगर, लिंक रोड, पिंपरी कॉलनी, पुणे.

13) अ. क्र. 13 ते 17 असे घटनास्थळावरून पळून गेलेले पाच आरोपीत इसम. त्यापैकी एक आरोपीत इसम हा स्विफ्ट कार क्र. 12 7788 चा मालक आहे. तर एक आरोपीत इसम हा लाल रंगाची डिओ कंपनीची दुचाकीचा मालक आहे. सदर दोघांनीही, पोलीस पथक आल्यावर गाड्या तेथेच टाकून, हॉटेलच्या मागच्या दाराने पळून गेलेले आहेत.

सदर अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, व घटनास्थळावरुन ( 4 रायटर व 4 खेळी व 9 पाहिजे आरोपी असे एकुण 17 आरोपी) रु.5,26,824/- चा किंमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर एकुण रु. 5, 26, 824/- च्या हस्तगत केलेल्या मुद्देमालात रु. 52,840/- ची रोख रक्कम, रु. 3, 75,000/- किमतीचे 4 दुचाकी व 1 चारचाकी वाहने, रु. 51,284/- किंमतीचा विदेशी दारूचा अवैध साठा, रु. 9,200/- किंमतीची जुगार साधने (त्यात जुगार साहित्यासह
6 टेबल्स, 6 खुर्च्या, 10 सोफे), रु. 38,500/- किंमतीची एकुण 13 मोबाईल हँन्डसेट, वगैरेचा समावेश आहे.

सदर अटक/कारवाई केलेल्या आरोपीविरुद्ध चतुःृंगी पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 311/22, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अ, 5 व 12 (अ) तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार खेळणारे व खेळवणारे हे एखाद्या कारमध्ये, रीक्षात अथवा दुचाकी वर बसून खेळी कडून मटका आकडा, सोरट व रक्कमेची देवाण घेवाण करतात. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून पसार होतात. पण आजच्या कारवाईत ज्या चारचाकी व दुचाकी वाहनांववरून घटनास्थळी मोबाईल जुगार खेळला जात होता ती वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सदरचा जुगाराचा अड्डा मागील अनेक वर्षांपासून स्पायसर रोड जवळील औंध सांगवी नदी पुलाच्या अलीकडेच, सुरू होता. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, नदीकाठी पाण्याची पातळी वाढल्याने, सदरचा जुगाराचा अड्डा हा तेथेच असलेल्या दर्शन रीव्हर साईड हॉटेलमध्ये व आसपासचे परीसरात सुरु करण्यात आला होता. या हॉटेलमध्ये बेकायदेशीर जुगाराबरोबरच विदेशी दारूचा अवैध साठा व विक्री देखील सुरू होती. त्यामुळे जुगार कारवाई बरोबरच दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात येऊन, विदेशी दारुचाही सर्व साठा जप्त करण्यात आलेला आहे.

सदर हॉटेल चालकाकडे, नमुद हॉटेल चालवणेबाबत, तसेच तेथे विदेशी मद्य साठवणे व विक्री करणेबाबत कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय परवाना आढळून आलेला नाही.

सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, महीला पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंधरकर, मपोह शिंदे, मपोह मोहीते, पोना कांबळे, पोना बरडे, पोना ढापसे यांच्या पथकाने केली आहे.

विशेष म्हणजे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते.