Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीसांच्या भागिदारीतील जुगार अड्यांवर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेची कारवाई

मार्केटयार्ड, धनकवडीसह सिटी पोस्टाजवळ कारवाई – उपमुख्य सुत्रधार फरार, खाकी वर्दीतील मुख्य सुत्रधार आजही मोकाट……

पुणे/दि/ प्रतिनिधी/
देशात व राज्यात 7 वा वेतन आयोग लागु झालेला आहे. शासन किंवा महापालिकेतील शिपाई पदाला देखील अर्ध्या लाखाच्यावर पगार मिळत आहे. वर्ग 3 मधील लिपिक टंकलेखक पदाला पाऊन लाखाच्या वर पगार मिळकत आहे. तरीही वरकमाईसाठी दर दिवशी कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. त्यातच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग या गुन्हे शाखेच्या युनिटने सर्वांनाच आश्चर्यकारक धक्का दिला आहे. पोलीस खात्यातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून सध्या पुणे शहरातील बहुतांश ठिकाणी मटका, जुगार अड्डे, क्लब चालविले जात असल्याची माहिती वारंवार मिळत असल्यानेच त्यांच्यावर धाडी टाकुन कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. मार्केटयार्ड, धनकवडी सह सिटी पोस्टाजवळील मटका व जुगार अड्डयांवर तडाखेबाज कारवाई करून धंदे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान उपमुख्य सुत्रधार हे फरार दाखविण्यात आले आहेत. शिवाय खाकी वर्दीतील मुख्य सुत्रधार मात्र पोलीस आयुक्तालयांपासून पोलीस स्टेशनपर्यंत मोकाट फिरत आहेत. त्यामुळे निव्वळ धंदयावर कारवाई करून चालणार नसून, मुख्य व उपमुख्य सुत्रधारांना जेरबंद करून, पुणेशहरातील अवैध धंदयाचे निर्मूलन होणे आवश्यक आहे.


धनकवडीतील के. के.मार्केट आणि के.के-
धनकवडी येथील के. के. मार्केट ट्रक टर्मिनल, शंकर महाराज मठ मंदिराजवळ, सातारा रोडवर दत्तात्रय गॅरज पार्कींग कंपाऊंडमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशिर ओपन कल्याण मटका व पंती – पाकोळी जुगार पैशावर गैरकायदेशिररित्या खेळत व खेळवित असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्यावरून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जुगार खेळणारे 4 इसम, खेळवणारे दोन इसमांसह दोन फरार इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
सुनिल क्षीरसागर – बालाजीनगर, उदय कहार- पर्वती पायथा, रोहित गायकवाड- इंदिरानगर बिबवेवाडी, सचिन रणवरे- जेजुरी, प्रकाश सरवदे- शंकरमहाराज वसाहत, कृष्णा जगदाळे सिंहगड रोड पर्वती यांना अटक करण्यात आली आहे. गणेश जगताप – रा. तळजाई वसाहत व किशोर कांबळे – राहणार तळजाई वसाहत हे फरार झाले असून पोलीस त्यांचा कसुन कसुन शोध घेत आहेत.
सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून संबंधितांविरूद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 4 (अ), 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार कुमावत, कांबळे, पठाण, कोळगे, चव्हाण व महिला पोलीस अंमलदार शिंदे, मोहिते, केकाण व धुरी यांच्या पथकाने केली आहे.
धनकवडीतील फाईव्ह स्टार सोसायटीतही धडक कारवाई
देश बंद असो की, महाराष्ट्र बंद असो, सोमवार असो की शनिवार – रविवार…. एवढंच कशाला कोरोना महामारीमध्ये संपूर्ण देश बंद असतांना देखील धनकवडीतील फाईव्ह स्टार सोसायटीतील जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नागरीकांनी दिली आहे. याच धंदयावर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी धडक कारवाई करून 23 इसमांविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडी येथील सावरकर चौकाजवळील फाईव्ह स्टार सोसायटीच्या तळमजल्यावर एका वनरूम किचन फ्लॅट मध्ये ओपन कल्याण मटका जुगार, पत्ता क्लब, खेळत व खेळवित असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार धनकवडी येथे धडक कारवाई करण्यात आली.
यामध्ये कांतीलाल काळे- तळजाई पठार, इसाक वजीर शेख – सिद्धार्थ वसाहत दाते स्टॉप, संदिप कांबळे- रा काशीनाथ पाटील नगर बालाजीनगर, बबन रणखांबे – रा. संतोषनगर कात्रज, विकास कसबे – रा. अण्णाभाऊ साइे नगर सासवड, समाधान बाळे वाघमारे – रा. तळजाई वसाहत, संतोष शेवते – रा. केशवनगर, धनकवडी, विनोद पवार – रा. मांगडेवाडी कात्रज, सुनिल सुर्यवंशी – रा. येनपुरेनगर धनकवडी, संजय शिंदे – रा. दौलतनगर धनकवडी, अनिल गायकवाड – जिजामाता चौक, आंबेगाव पठार, अर्जून कदम – रा मोहननगर धकनवडी, पांडरूंग इंगळे – रा जांगभुळवाडी, अहिजत सपकाळ – रा ज्योती दर्शन धनकवडी, विष्णु ढगे – आंबेगाव पठार, संदीप विश्वनाथ विणपुरे – रा वनराई कॉलनी प्रियदर्शन शाहेजवळ, निनायक डांगे – रा साईसिद्धी चौक धनकवडी, ज्ञानेश्वर कुचेकर – रा. गुलाबनगर धकनवडी, चंद्रकांत तोडकरी – रा. मोहनगनर, दिगंबर संगरकर रा- चव्हाण नगर धनकवडी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुनिल निर्मल रा फाईव्ह स्टार सोसायटी व किशोर कांबळे रा तळजाई हे फरार असून पोलीस त्यांचा कसुन…. कसुन… कसुन.. शोध घेत आहेत.23 इसमांच्या अटकेसह सुमारे 1 लाख पाच हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दुसऱ्याच्या हद्दीत शिरला अन्‌‍ कारवाई ओढवून बसला –
पुण्यातील पेठांचं
आपलं आपलं वेगळंपण आहे.
इथ कुणीच कुणाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. पाळीव किंवा
भटकी कुत्री देखील दुसऱ्याच्या हद्दीत येरवाड करायला जात नाहीत किंवा कुणी त्यांच्या हद्दीत शिरकाव केला तर लागलीच सगळी भटकी कुत्री एकत्र येवून भुंकून भुंकून, अगांवर धावुन जावून समोरच्या कुत्र्याला हुसकावन लावत असल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. अगदी तशीच अवस्था एका जुगार सम्राटाची झाली आहे. स्वतःची हद्द सोडून दुसऱ्याच्या हद्दीत शिरला अन्‌‍ कारवाई ओढवुन बसला अशी अवस्था झाली आहे. (भटक्या कुत्र्याची स्टोरी माझी नाही. अवलोकनही माझे नाही. एका पोलीस मित्राने केलेले वर्णन आहे याची नोंद घ्यावी) सिटी पोस्टाच्या पाठीमागे महाराष्ट्र मित्र मंडळाजवळची बिल्डींग, क्रांती चौक शुक्रवार पेठ येथील तळमजल्यावरील एका खोलीत तीन पत्ती जुगार खेळविला जात असल्याची खबर पोलीसांना मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीसांनी रात्रौ साडेबाराच्या सुमारास धाड टाकुन 13 इसमांविरूद्ध जुगार प्रतिबंध कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे.
यात अतुल उमापती- रा. गुरूवार पेठ, सुहास दाखले -वनशिव वसाहत, महादेव वाकेफोडे रा बिबवेवाडी भालेनाथ बनसाडे रा. मार्केटयाड, इंद्रजित पाटील रा सदाशिव पेठ, निखिल मारणे रा मुळशी, परशुराम नाडर – रा ताजमहाल बिल्डींग बुधवार पेठ, तुकाराम मारणे- रा मुळशी, मंदार काळे रा – कसबा पेठ, तुषार बहुले रा- गंडाचा गणपती, निखिल क्षीरसागर – रा कसबा पेठ, ऋषिकेश जाधव रा. शुक्रवार पेठ, यांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. रोख रकमेसह 77 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केलेले अवैध धंदे हे राजेश पुराणिक आले म्हणून सुरू नव्हते. तर ते वर्षानुवर्ष सुरू आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या नोंदीनुसार या सर्व ठिकाणी धंदे सुरू असल्याचे माहिती आहे. परंतु एकाही पोलीस स्टेशनने कारवाई केली नाही. कारवाई करायची असेल तर पंटर पाठवुन, त्यांच्यावर गून्हे दाखल करणे याच्या पलिकडे काहीच केले नाही. त्यातही अवैध धंदे हे जर पोलीसांचे असतील तर नाममात्र देखील कारवाई केली जात नाही.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन ठिकाणी केलेल्या कारवाईतील धंदे हे एका पोलीस कर्मचाऱ्याचे असून, त्याची बदली आता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे आहे. तरी देखील कर्तव्य सोडून हे महाशय धंदयावर येवून बसलेले असतात. दुपारी 4 वाजता आणि संध्याकाळी 10 नंतर इथेच असतात. त्यांना कधीच पोलीस बंदोबस्त नसतो. सदा सर्वदा ते धंदयावर असतात.
पुणे शहरातील बहुतांश धंदयामध्ये पोलीसांची भागिदारी असल्याचे बोलले जाते ही यादी पुढील काळात यथावकाश जाहीर केली होईल. श्री. राजेश पुराणिक व संपूर्ण सामाजिक सुरक्षा विभाग युद्ध मोहिमेवर आहेत. सर्वांनाच तुर्तातूर्त शुभुच्छा.