Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आंबेडकरनगरात गोळीबार, मार्केटयार्ड पोलीसांनी 24 तासाच्या आत आरोपी संतोष कांबळेच्या मुसक्या आवळल्या

marketyard police

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गुलटेकडी येथील आंबेडकरनगर वसाहत ही मुळातच गोरगरीब, कष्टकरी, हमाल व मजुरीवर काम करणाऱ्यांची वसाहत म्हणून ओळखली जाते. याच वसाहतीत संतोष वामन कांबळे, वय 35 वर्षे, रा. आंबेडकरनगर, गल्ली नं. 11, मार्केटयार्ड पुणे याने आंबेडकरनगर परीसरात पिस्तुलाने गोळीबार करुन फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झाला होता. याबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असल्याने, पुणे शहर पोलीसांकडील गुन्हे शाखेच्या यंत्रणांनी जंगजंग पछाडले असता, आरोपीचा शोध लागत नव्हता. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम गायकवाड व त्यांच्या टिमने अतिशय शिताफीने आरोपीला अटक केले आहे. अवघ्या 24 तासात मार्केटयार्ड पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 आंबेडकरनगरात गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीचा तपास मार्केटयार्ड पोलीसांकडील सपोनि के.बी. डाबेराव करीत होते. त्यातच गोळीबाराची घटना घडल्याने वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री. रामनाथ पोकळे (अप्पर पोलीस आयुक्त),   श्री. विक्रांत देशमुख, (पोलीस उपायुक्त परिमंडळ 05)  पौर्णिमा तावरे, (सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी प्रकरण गांभिर्याने घेतले. 
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि मदन कांबळे, पोउपनि शिंदे, पोना 7554 जाधव, पोना 7740 मोघे, पोना 6569 ढवाण, पोअं 2392 यादव, पोअं 8386 लोणकर, पोअं. 8235 गायकवाड, पोअं 10464 झायटे यांची टिम तयार करून गुन्हेगारांचा शोध घेत होती. प्रकरण गंभिर स्वरूपाचे असल्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील इतर गुन्हे शाखा युनिट देखील फरार आरोपींचा शोध घेत होती. 
दरम्यान मार्केटयार्ड पोलीसांनी फरार झालेल्या आरोपीस आंबेगाव येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.