Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे मनपा बसस्टॉपवर दरोडा घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महापालिका बस्ट स्टॉपवरून पुणे स्टेशन कडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जाणाऱ्या फिर्यादी सौ. सोनाली प्रशांत काकडे, वय 30 वर्ष, नर्स, रा. सदानंदनगर मंगळवार पेठ यांच्या हातातील पर्स बळजबरीने हिसका मारून चोरी करून नेल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून, अट्टल गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केले आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि. 16/12/2023 रोजी फिर्यादी सौ. सोनाली प्रशांत काकडे वय 30 वर्षे व्यवसाय- नर्स, रा-दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे यांनी तक्रार दिली की, मनपा बस स्टैंड येथून पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कुटरवर अंदाजे 20-25 वर्षांचे दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे हातातील काळी पर्स बळजबरीने हिसकावुन चोरी करून नेली म्हणुन त्याबाबत शिवाजीगनर पो.स्टे गु.र.नं. 254 / 2023. मा. द. वि. कलम 392,34 अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील नमुद अनोळखी इसमांचा तपास चालू असताना शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक श्री. प्रताप साळवे, पोलीस अंमलदार पोहवा. 947 पवार पो.शि. 4592 दडस यांनी समांतर तपास चालू केला. पो.शि. 4592 दडस यांना सिसिटीव्ही फुटेजचे आधारे व त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दि. 15/12/2023 रोजी मनपा येथे महिलेला लुटणारे अनोळखी इसम हे जुनी कामगार पुतळा वसाहत, शिवाजीनगर येथे आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.  

ती बातमी त्यांनी तपासपथकाचे प्रभारी पोलीस उपनिरिक्षक श्री प्रताप साळवे यांना सांगतली. त्याची खात्री करुन मिळालेली बातमी पो.उ.नि. श्री प्रताप साळवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांना तातडीने सांगुन त्यांच्या आदेशाप्रमाणे व सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर, मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त परि 2 मा. श्री. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रा. विभागाचे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक श्री प्रताप साळवे, पोलीस अंमलदार पोहवा. 947 पवार, पोहवा 7830 शेख, पोहवा. 6645 काळे, पो.शि. 4592 दडस यांनी दोन टिम करुन जुनी कामगार पतळा वसाहत येथील पुलाचे मागे पुढे सापळा रचुन बातमीत मिळालेल्या वर्णनाचा इसम हा एका अनोळखी इसमासह टीव्हीएस गाडीसह थांबलेला असल्याचे दिसल्याने वरील स्टाफचे मदतीने दि. 16/12/2023 रोजी 15/25 या त्यांस जागीच पकडले. 

तेव्हा त्यांस त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांने त्याचे नाव आदीत्य विजय शिंदे, वय 21 वर्षे, रा-करपे वाडा. सोमवारपेठ, पुणे असे असल्याचे सांगितले व दुसऱ्या इसमाने त्याचे नाव गणेश चंद्रकांत कपडे, वय 19 वर्षे रा-सदानंदनगर, तिसरा मजला, पलॅट नं- 325, मंगळवार पेठ, पुणे असे सांगीतले, त्यांचेकडे सदर दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. 

गुन्हयातील वापरलेली स्कुटर ही सुध्दा आरोपीकडुन जप्त करून हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा दाखल झाल्यापासून सहा तासाच्या आत आरोपी पकडुन त्यांना गुन्हयात अटक केली व गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मुद्देमाल व वापरलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच नमुद गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे हे करीत आहेत.