Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

नॅशनल फोरम/अनिरूद्ध शालन चव्हाण…..
काल पर्यंत कै. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील गटातटांवर नेहमी भाष्य करीत असत. काय हे गट… काय हे तट… म्हणून खिल्ली उडवली जात होती. देशातवर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने तर नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या गटाविषयी गरळ ओकली आहे. परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना फुटली. त्यात ठाकरे गट, शिंदे गट तयार झाले. पुढे निवडणूकांनतर किती गट पडतील हे सांगताही येणार नाही. आता काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित दादा पवार गट तयार झाले. काँग्रेस मध्ये देखील उघड फुट न पडतात, अंतर्गत मोठ मोठे गट कार्यरत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीला या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात येत आहे. खरं आहे. देश व राज्यातील प्रबळ सत्ताधारी पक्ष हा नेहमीच देशातील व राज्यातील दुबळ्या, लहान पक्षातील सत्तापिपासून पुढाऱ्यांना सत्तेची लालुच दाखवुन पक्ष फोडत आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचेही तेच झाले. प्रस्थापित सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडणाऱ्या रिपब्लिकन पक्षात 60/ 65 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसने कायम फुटी पाडत आले आहेत. फुले,शाहू आंबेडकरी चळवळीत फुट पाडण्याचे कारस्थान तर नेहरूंपासून सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने काँग्रेसेच्या पावलांवर पाऊल ठेवून सत्ता राबवित आहेत, एवढचं काय ते दिसून येत आहे.

देशात आणि राज्यात मागील 50/60 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये उभी फूट पडून त्या पक्षाची शकले उडालेले आहेत. प्रत्येक पक्षामध्ये गट आणि तट निर्माण झाले आहेत. दरम्यान मागील 30 ते 40 वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्षाला कायमस्वरूपी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना सारख्या पक्षाने रिपब्लिकन कवाडे, रिपब्लिकन गवई, रिपब्लिकन खोब्रागडे, रिपब्लिकन कांबळे आणि रिपब्लिकन आंबेडकर असे गट तट असल्याचं अनेक वर्ष हिणवलं. परंतु आज 2023 मध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि या गटामध्ये देखील नवीन गट तट निर्माण झालेले आहेत.

 सत्ताधारी असलेल्या व मागील 50/60 वर्षांपासून सत्तेमध्ये असलेल्या शरद पवार यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या असुरी महत्त्वकांक्षापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडल्याचा आरोप केलेला आहे. तसेच भाजपा विरोधात रणशिंग फुंकले आहे. थोडक्यात सत्ताधारी असलेला पक्ष हा कायमच त्यांना आव्हान देणाऱ्या लहान व किरकोळ पक्षांमध्ये फूट पाडून त्यांची अभद्य ताकद मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असतो हे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे. रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटना देखील आप आपल्या परीने कुठलीही साधनसामग्री, सत्ता संपत्ती नसताना, वडिलोपार्जित कुठल्याही प्रकारची सत्ता किंवा संपत्तीचा वारसा नसताना देखील रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळीतील संघटना बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत आंदोलन करत होती. ज्या ज्या काळामध्ये देशात आणि महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीची ताकद वाढल्यानंतर ती अभेद्य ताकद कशी मोडून काढायची याबाबत मागील 70/75 वर्षांमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने रिपब्लिकन पक्षाची अभेद्य ताकद मोडून काढण्याची, त्याच्यामध्ये फुट पाडण्याचे काम वर्षानुवर्ष केलेले आहे. 

रिपब्लिकन पक्ष म्हणजे गटातटाचे राजकारण, एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे काम इथल्या सत्ताधारी , सत्तापिपासून प्रस्थापित पक्षाने केलेल्या असल्याचे आज दिसून येत आहे. स्वतः आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर मागील 50-60 वर्षांपासून सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना सत्तेची ताकद, सत्तेची पावर, नेमकी काय असते हे आत्ताशी जाणवु लागलेलं आहे. म्हणजे थोडक्यात पवारांनी मागील 30/40 वर्षांमध्ये महाराष्ट्रामधील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ, शेतकऱ्यांची आंदोलने, सहकार चळवळीत अनेक ठिकाणी फूट पाडण्याचे, त्यांची  ताकद कमी करण्याचे काम केल्याचे आरोप अनेक लहान मोठ्या पक्षाच्या नेतृत्वाने केलेले आहेत.

 आज ज्या पवारांनी इतरांच्या विषेशतः फुले,शाहु, आंबेडकरी चळवळीमध्ये आगी लावल्या, आज त्यांच्याच पक्षाला, सत्ताधारी असलेल्या भाजपसारख्या पक्षाने आग लावल्यानंतर, सत्तेचा प्रभाव किती असतो हे पवारांना आज समजला की काय अशी आजची परिस्थिती आहे. थोडक्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळ वाढू दिली नाही. इथल्या बहुजन समाजाला सत्ताधारी होऊ दिले नाही. इथल्या बहुजन समाजाला उद्योजक होऊ दिले नाही. शिक्षण महाग केले, आरोग्य सुविधा महाग केल्या, सर्व ठिकाणी खाजगीकरण आणण्याचं काम सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे आज राज्यामध्ये ज्या विष वृक्षांची वाढ झाली आहे त्या विषवृक्षाची लागवड ही सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. सत्ता काय असते त्याचा हा परिपाक